गाजराची कोशिंबीर
Serving : 2/3 person Time : 15 min साहित्य : गाजर ( मध्यम ) 2 किसलेले हिरवी मिरची २ ते ३ कढीपत्ता पानं २/३ लिंबाचा रस १/२ टेस्पून साखर १/२ टीस्पून तिळ १/२ टेस्पून तेल १टेस्पून जीर , मोहरी १/२ हिंग चिमुटभर मीठ चवीनुसार कोथिंबीर कृती : एका बोव्ल मध्ये किसलेले गाजर (धुवून,सोलून) घ्यावे. फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, तिळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग घालावं सगळं छान परतवून हि फोडणी गजरावर घालावी. नंतर त्यावर लिंबाचा रस, कोथिंबीर व मीठ , साखर घालावी. कोथिंबीर घालून सर्वं करावी .