काकडीची कोशिंबीर
काकडीची कोशिंबीर Video@tangyBuds@YoutubeChannel साहित्य : काकडी २ मध्यम दही २ मोठे चमचे दाण्याचा कूट २ चमचे मीठ स्वादानुसार साखर १ छोटा चमचा फोडणीकरिता : तेल १ मोठा चमचा मोहरी १ / २ चमचा जिरे १ / २ चमचा हिंग १ / २ चमचा कढीपत्ता २ ते ३ हिरवी मिरची २ / ३ बारीक चिरलेल्या हळद १ / २ चमचा कृती : एका mixing bowl मध्ये काकडी सोलून , किसून आणि पिळून घ्या , त्यात दाण्याचा कूट , दही , साखर आणि मीठ टाकून घ्या . एका कढल्यात तेल गरम करा त्यात मोहरी , जीरं , कढीपत्ता , हिरवी मिरचीचे तुकडे टाका , फोडणीचं झाली कि त्यात हिंग आणि हळदी घाला आणि गॅस बंद करा . हि फोडणी मिक्सिन्ग बाउल मध्ये घाला आणि सगळं छान एकत्र करा . कोथिंबीर ने छान सजवा . झटपट काकडीची कोशिंबीर तयार .