आठवणीतील कार्विंग
आठवणीतील कार्विंग Vegetable and fruit carving एक सुंदर कला. Google वर शोध घेतला तर अगदी इतिहासापासून सविस्तर माहिती मिळते. पण खऱ्या अर्थाने food carving म्हणजे काय आणि त्याचं महत्व ते काय? तर food carving म्हणजे अन्नापादार्थावरील कोरीव काम. अशी एक कला कि ज्याद्वारे आपण भाज्या, फळं , अन्नपदार्थांना नवनवीन आकार देऊन त्यांना अधिक आकर्षक बनवू शकतो, त्याच प्रमाणे भूक वाढविण्यास आणि सोयीस्कररीत्या अन्नाचा आस्वाद घेण्यातही मदत होते. कधी decoration साठी तर कधी पाहुण्यांच्या अगत्यासाठी हि कला उपयोगात पडते. " खाण्यासाठी जन्म आपुला " म्हणत जे पानात पडेल त्याची चव आपण घेतोच. कधी आवडीचे पदार्थ असो वा नसो त्यांचे आहारातील महत्व जाणून आपण ते स्वाः करतोच. पण खरी तारांबळ उडते ती, हे सगळं मुलांच्या तोंडी उतरवताना.. मग अशावेळी कामी येते ती हि food carving ची कला!!! ह्यामुळे अन्नापादार्थाना नवनवीन आकार देऊन मुलांसमोर ठेवले कि त्यांच्या Hunger Hormones ला उत्तेजन मिळते आणि आपल काम सोप्पं. " नववधू प्रिय मी बावरते " असं म्हणत जेव्हा सासरचा उंबरठा ओलांडतो तेव्हा, नवं घ...