आठवणीतील कार्विंग

आठवणीतील कार्विंग

Vegetable and fruit carving एक सुंदर कला. Google वर शोध घेतला तर अगदी इतिहासापासून सविस्तर माहिती मिळते. पण खऱ्या अर्थाने food carving म्हणजे काय आणि त्याचं महत्व ते काय? तर food carving म्हणजे अन्नापादार्थावरील कोरीव काम. अशी एक कला कि ज्याद्वारे आपण भाज्या, फळं , अन्नपदार्थांना नवनवीन आकार देऊन त्यांना अधिक आकर्षक बनवू शकतो, त्याच प्रमाणे भूक वाढविण्यास आणि सोयीस्कररीत्या अन्नाचा आस्वाद घेण्यातही मदत होते. कधी decoration साठी तर कधी पाहुण्यांच्या अगत्यासाठी हि कला उपयोगात पडते. "खाण्यासाठी जन्म आपुला" म्हणत जे पानात पडेल त्याची चव आपण घेतोच. कधी आवडीचे पदार्थ असो वा  नसो त्यांचे आहारातील महत्व जाणून आपण ते स्वाः करतोच. पण खरी तारांबळ उडते ती, हे सगळं मुलांच्या तोंडी उतरवताना.. मग अशावेळी कामी येते ती हि food carving ची कला!!! ह्यामुळे अन्नापादार्थाना नवनवीन आकार देऊन मुलांसमोर ठेवले कि त्यांच्या Hunger Hormones ला उत्तेजन मिळते आणि आपल काम सोप्पं.


 "नववधू प्रिय मी बावरते" असं  म्हणत जेव्हा सासरचा उंबरठा ओलांडतो तेव्हा, नवं घर, नवी नाती, नवी माणसं ह्यामध्ये कसं वावरायचं हेच सुचत नाही. पण खर्या अर्थाने बावरायला होतं ते प्रत्येकाच्या आपल्यावर खिळलेल्या नजरेने… मग आपल्या रोजच्याच गोष्टी नव्याने कळतात, काकू छान दिसते, वाहिनी छान बोलते, अमुक आणि तमुक.. पण खरी परीक्षा असते जेव्हा स्वयंपाक घराचा ताबा घेण्याची वेळ येते.  माहेरी मुलीनी-ताईनी केलेल्या प्रत्येक गोष्टीचं  कौतुक होणं स्वाभाविक आहे कारण तिथे प्रेमाचा ओलावा हा असतोच, पण सासरी मात्र नव्याने निर्माण करायचा असतो. असं म्हणतात कि प्रेमाची वाट हि पोटाकडून हृदयाकडे जाते त्यामुळे दडपण हे वाढतचं, पण अशावेळी आईनी सांगितलेली गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे अन्नाची चव जरी आपण तोंडाने घेत असलो तरी तिचा पहिला आस्वाद हा डोळ्यांनी घेतला जातो. Tempting , yummy हे शब्द पदार्थ बघताक्षणीच उदगारले जातात अगदी नकळत. मग काय असं सगळं विचारात घेऊन साधाच पण रुचकर स्वयंपाक, डावं उजवं सांभाळून, छानसं garnishing, जरासं table decoration करून केलं कि दाद तर मिळणारच. Presentation always matters ते काही खोटं नाही.
हल्ली लग्न, मुंज बारसं अशा विविध समारंभांना कॅटेरेर त्यांची कलात्मकता, food carving ने अतिशय सुंदर स्वरुपात दाखवतात आणि त्यांच्या चवदार जेवणासारखच, डोळ्यांनाही सुखद आस्वाद देतात. पण खरं सांगायचे झाले तर हि कला म्हटली कि मला आठवतात ते चैत्र गौर, गौरी गणपतीचे दिवस… सगळीकडे आनंदी आनंद गडे … सर्वत्र उत्साहाची, आनंदाची लाट आलेली असते. जिथे तिथे बायकांची लगबग सुरु असते. आणि त्यात चैत्र गौर, महाल्क्षमीचे हळदी कुंकू म्हंटले कि विचारायलाच नको, आपल्यातले सुप्तगुण दाखवण्याची संधीच जणू … अंगणात, गौर बसवलेल्या ठिकाणी एकाहून एक सुबक रांगोळ्या, घरात नवनव्या पदार्थांची रेलचेल आणि इतकासगळं  करूनही गौरीपुढे जे फळं वा भाज्या ठेवायच्या त्यावर केलेले कोरीव काम. त्यावेळी carving tools असा काही नव्हत मिळत पण तरी जमेल तसा पण, सध्या पद्धतीने फळांना, भाज्यांना आकार दिले जायचे. त्यामध्ये मुख्यत्वे करून कलिंगड, खरबूज, काकडी, केळी ह्यांचा समावेश असायचा. आत्ता सारखा professional  आणि commercial look नसेल त्याला, पण हौसेचा, आठवणींचा ओलावा, स्पर्श, स्वाद नक्कीच आहे. आमच्याकडे नव्हते हे सगळे पण आई आत्या, मामी ह्यांच्या कडे आवर्जून पाठवायची. आम्हा बहिणींमध्ये कामाची वाटणी झालेली असायची पण ह्या कलिंगड आणि खरबुजाच्या कोरीव कामासाठी आम्ही आजी, मामीच्या मागे तगादा लावायचो. मग मामी त्यावर काही आकार पेनानी गिरवून द्यायची आणि आम्ही ते त्यांच्या सुचने नुसार करायचो. काय छान दिवस असतात न बालपणीचे… प्रत्येक आठवण मनाच्या कप्प्यात घर करून असते. आपण मोठे होतो ती आठवणींची साठवण घेऊनच.  आजही घरी सणावारांना, काही विशेष दिनी हि कला ह्या आठवणी जपण्याचा आणि नवीन आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्त्याने सुरु असतो. आज ह्या vegetable and fruit carving च्या विषयामुळे माझ्यामानातील ह्या आठवणींना उजाळा मिळाला!!!
                                                   सोनिका आशिष लोटांगणे 

Comments

Popular posts from this blog

Dashmi

शेवेची भाजी / आमटी

Shev Curry/ Shev Bhaji

Phodnichi Poli/ Kuskara/ Poliche Tukade

Dal chakolya / varan phal

फोडणीची पोळी / कुस्करा / पोळीचे तुकडे

Vada Rassa