शेवेची भाजी / आमटी
शेवेची भाजी / आमटी
हि अस्सल खानदेशी recipe
आहे. झणझणीत खाण्याची लहर आली कि
आठवते शेवेची भाजी. झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी.
वेळ : २०-२५ मिनिट
३ जणांसाठी
साहित्य:
जाड शेव
(भावनगरी)
२ कांदे बारीक
चिरलेले
२ टोमाटो
बारीक चिरलेले
३/४ लसुन
पाकळ्या
३Tsp किसलेले सुके खोबरे
२/३ लवंग
२ वेलदोडा
(वेलची)
कढीपत्ता
कोथिंबीर
२/३ tsn तिखट
१tsn हळद
२tsn कांदा लसून मसाला
१tsn गोडा मसाला
१tsn जीर
मीठ चवीनुसार
२Tsn तेल
कृती:
१. पँन मध्ये १ tsn तेल घाला व तेल गरम झाल्यावर त्यात लवंग,
वेलची, जीर घालून fry करा. मग त्यात कांदा गुलाबी होईस्तोवर fry करा. हे मिश्रण बाजूला काढून घ्या.
२. परत, पँन मध्ये १ tsn तेल घाला व तेल
गरम झाल्यावर खोबरं घालून तेही गुलाबी होईस्तोवर परतून घ्या. हे सगऴ मिश्रण mixer च्या भांड्यात काढून घ्या मग त्यात लसुन थोडी कोथिम्बिर कढीपत्ता
घालून वाटून घ्या.
३. टोमाटो ची puree वेगळी करून घ्या.
४. पँन मध्ये तेल घालून हा मसाला खमंग fry करून घ्या. (मसाल्याला तेल सुटायला लागलं
म्हणजे मसाला छान fry झाला हे सामजावा)
५ त्यानंतर त्यात टोमाटो puree घालून परतावा
मग तिखट, हळद, गोडा मसाला, कांदा-लसुन मसाला घालून परतवून घ्या. नंतर पाणी घालून
उकळी आली कि मीठ घाला.
६. serve करताना शेव घालून serve करा.
नोंद : जाड शेवच वापरावी. बारीक शेव आमटीत
विरघळून जाईल. शेव नेहमी आईत्या वेळेस घालावी.
हा मसाला तयार करून freeze मध्ये ठेवू शकतो. कुठल्याही मसाला भाजीसाठी हा वापरता येतो आणि
वेळही वाचतो.

Comments
really very awesome. Kindly conrinue guiding with such spicy dishes.