फोडणीची पोळी / कुस्करा / पोळीचे तुकडे
२ ते ३
जणांसाठी
वेळ: १५
मिनीटे
साहित्य:
७ ते ८ पोळ्या
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल,
चिमूटभर
मोहोरी,
१/४ टिस्पून जिरे,
चिमूटभर हिंग,
१/४ टिस्पून हळद,
१ ते २ टिस्पून लाल तिखट,
२ कढीपत्ता पाने.
१ कांदा,
बारीक चिरलेला
२ टेस्पून
शेंगदाणे
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
१) पोळ्या
मिक्सरमध्ये / हाताने बारीक कुस्करून घ्याव्यात.
२) कढईत २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे,कढीपत्ता,शेंगदाणे व्यवस्थित परतावे मग त्यात, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून परतावे.
३) तयार
फोडणीत बारीक केलेल्या पोळ्या घालाव्यात आणि परतावे. मिठ आणि साखर घालून २ मिनीटे
मंद आचेवर वाफ काढावी.
फोडणीची पोळी
तयार झाली कि कोथिंबीर घालून गरमा गरम, दही किंवा ताकासोबत सर्व्ह करावे.
.jpg)
Comments