फोडणीची पोळी / कुस्करा / पोळीचे तुकडे



२ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे


साहित्य:
७ ते ८ पोळ्या
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल,
 चिमूटभर मोहोरी,
 १/४ टिस्पून जिरे,
 चिमूटभर हिंग,
 १/४ टिस्पून हळद,
 १ ते २ टिस्पून लाल तिखट,
 २ कढीपत्ता पाने.
१ कांदा, बारीक चिरलेला
२ टेस्पून शेंगदाणे
चवीपुरते मिठ
 १/२ टिस्पून साखर
 चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) पोळ्या मिक्सरमध्ये / हाताने बारीक कुस्करून घ्याव्यात.
२) कढईत २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे,कढीपत्ता,शेंगदाणे व्यवस्थित परतावे मग त्यात, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून परतावे.
३) तयार फोडणीत बारीक केलेल्या पोळ्या घालाव्यात आणि परतावे. मिठ आणि साखर घालून २ मिनीटे मंद आचेवर वाफ काढावी.

फोडणीची पोळी तयार झाली कि कोथिंबीर घालून गरमा गरम, दही किंवा ताकासोबत सर्व्ह करावे.

Comments

Ashish Bhojane said…
आमच्या विदर्भात याला 'पोळीचा तिखट चुरमा' असेही एक नाव आहे. सुटसुटीत recipe दिल्याबद्दल blogger ला धन्यवाद.
gayatri said…
This comment has been removed by the author.
gayatri said…
Thank you for such a nice and simple receipe

Popular posts from this blog

Dashmi

शेवेची भाजी / आमटी

Shev Curry/ Shev Bhaji

Phodnichi Poli/ Kuskara/ Poliche Tukade

Dal chakolya / varan phal

Vada Rassa