कांदा टोमाटो कोशिंबीर
साहित्य :
२ टोमाटो बारीक चिरलेले
१ कांदा बारीक
चिरलेला
२ हिरव्या
मिरच्या जाडसर चिरलेल्या
२/३ कढीपत्ता
पानं
२ teaspoon साखर
मीठ चवीनुसार
१Tsn तेल
जीर, मोहरी १/२ teaspoon
हिंग,हळद
चिमुटभर
दही २ Tspoon
दाण्याचा कुट २ Tsp
कोथिंबीर
कृती :
१. एका bowl मध्ये चिरलेला कांदा टोमाटो घ्यावा .
२. फोडणीसाठी कढल्यात तेल गरम
करावं, त्यात मोहरी जीरा घालावं, मोहरी
तडतडली कि कढीपत्ता, मिरची घालावी, नंतर हिंग, हळद घालावी.
३. हि फोडणी bowl मधिल मिश्रणात घालावी व साखर, मीठ ,दही
,दाण्याचा कुट, कोथिंबीर घालुन नीट कालवून घ्यावं .
Note : दही, मीठ व साखर हे नेहमी सर्विंग च्या वेळीच घालावे नाहीतर कोशिंबीरीला पाणी सुटतं.
.jpg)
Comments