व्हेज सँडविच विथ रांच ड्रेसिंग
साहित्य :
Whole wheat bread ४ slices
कोबी बारीक
चिरलेला १/२ कप
Lettuce चिरलेला १कप
गाजर किसलेले
१कप
कांद्याची पात
१/२कप
काळी मीर पूड १/२tsn
मीठ चवीनुसार
तिखट १/२tsn
Ranch ड्रेसिंग २Tsn
Cheese (आवडीनुसार )
Butter १Tsn
टॉमेटो केचप
कृती:
१. कोबी, गाजर, कांद्याचीपात,lettuce सगळं एका bowl मध्ये घेऊन त्यात तिखट, मीर पूड,
मीठ, cheese (आवडीनुसार) घालुन mix करून त्यात Ranch
ड्रेसिंग घालून परत mix
करावं .
२. २ ब्रेड स्लाय्सेसला butter लावून घ्यावे,
त्यावर bowl मधील मिश्रण घालावं
३. उरलेल्या २
स्लाईसेस वर टॉमेटो केचप लावावा व टॉमेटो केचप लावलेला ब्रेड मिश्रण घातलेल्याला
ब्रेडवर ठेवून सॅंडविच तयार करावं.
४. बाहेरून
थोडेसे बटर लावून सॅंडविच टोस्टरमध्ये सॅंडविच टोस्ट करून घ्यावे. टोस्टर नसेल तर
सॅंडविच तव्यावर भाजावे. भाजताना किंचित दाब देउन दोन्ही बाजू लाईट ब्राऊन
होईस्तोवर भाजावे.
५. गरम
सॅंडविच हिरवी चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.
.jpg)
Comments